उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
HSC Exam Admit Card – ऑनलाइन उपलब्ध
मुंबई, दि. 10 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.
सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रवेशपत्रे डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यास, संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांनी त्यांच्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन MSBSHSE ने केले आहे.
HSC/12th Exam
महत्त्वाच्या तारखा
प्रवेशपत्रे उपलब्ध होण्याची तारीख: १० जानेवारी २०२५
प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी: २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५
लेखी परीक्षा कालावधी: ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया
अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर जा.
‘ऍडमिट कार्ड’ या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून, संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करा.
प्रवेशपत्रांची प्रिंटआउट काढून ठेवा.
सूचना
प्रवेशपत्रावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
काही त्रुटी आढळल्यास त्वरित विभागीय मंडळाशी संपर्क साधा.
परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे प्रवेशपत्र सुरक्षित ठेवा.